गुरूवार, मार्च 4, 2021
Home ताजी बातमी बुद्धीबळाच्या जागतिक नकाशावर अहमदनगरला चमकाविणारे गागरे भावंडं..!

बुद्धीबळाच्या जागतिक नकाशावर अहमदनगरला चमकाविणारे गागरे भावंडं..!

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावातील भावंडे शार्दुल आणि शाल्मली गागरे यांनी बुद्धिबळ मधील आपले कौशल्य जागतिक पातळीवर प्रदर्शित करुन सर्वांना अचंबित केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावातील भावंडे शार्दुल आणि शाल्मली गागरे यांनी बुद्धिबळ मधील आपले कौशल्य जागतिक पातळीवर प्रदर्शित करुन सर्वांना अचंबित केले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर शहरातून शंभरहून अधिक मानांकीत बुद्धिबळपटू भरभराटीला येत असून या खेळासाठी राज्यातील आकर्षण केंद्र बनले आहे.

एका दशकापूर्वीही तेथे काहीही नव्हते आणि याची सुरुवात शार्दुल गागरे यांनी केली होती. शार्दुलने पाच वर्षांच्या कोवळ्या वयात बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली होती त्यानंतर त्याने मागे वळून कधीच नाही पाहिले. २०१६ मध्ये, शार्दुल ग्रँडमास्टर बनला आणि त्यानंतर त्याची प्रगतिपथावर वाटचाल सुरु झाली.

द ब्रिजशी बोलताना शार्दुल म्हणाला, “मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली, त्यावेळी अहमदनगरमध्ये बुद्धिबळाचा एकही मानांकीत खेळाडू नव्हता. मी पाच वर्षांचा असताना मी माझ्या काकांच्या घरी गेलो तेव्हा मला एक चेसबोर्ड सापडला, ज्यामुळे मला खेळाची आवड निर्माण झाली. मी स्थानिक बुद्धिबळ कोचिंग सेंटरमध्ये दाखल झालो आणि एका वर्षातच मी  ७ वर्षे अंतर्गत असलेली बुद्धिबळचे राष्ट्रीय पातळीवरचे जेतेपद जिंकले.”

Shardul gagare
शार्दुल गागरे

तसे शार्दूल त्याच्या बुद्धिबळच्या प्रवासात एकटा नव्हता. शार्दूलबरोबर सराव करु शकणारे त्यावेळी कोणतेही खेळाडू नसल्यामुळे त्याची बहीण शाल्मलीने बुद्धिबळ शिकले आणि तिने या खेळामुळे आपल्या भावाशी एक अतुलनीय नातं निर्माण केला ज्यामुळे ते दोघेही यश मिळविण्यास सक्षम राहिले.

शाल्मली म्हणाली, “शार्दुलला खेळायला प्रतिस्पर्ध्याची गरज होती म्हणून माझी बुद्धिबळाची ओळख झाली. आणि त्याच्याबरोबर, मला खेळासाठी माझी लय सापडली. अखेरीस, मी चांगलं खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर एका वर्षाच्या आत माझ्या वयोगटातील मी राष्ट्रीय चॅम्पियन बनली.”

शाल्मली ही एक वूमेन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) आहे आणि तिने २०१९ साली चेक रिपब्लीक आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेत तिचा पहिला महिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला आहे.

Shalmali gagare
शाल्मली गागरे

त्यानंतर शार्दुलने २००७ मध्ये १० वर्षे अंतर्गत आशियाई जेतेपद जिंकले होते, तर शाल्मलीने १२ वर्षांखालील असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या भाऊ-बहिणीच्या जोडीने एकत्र प्रवास केला आणि स्वतः च्या नावे बर्‍याच पदव्या मिळविल्या आहेत.

अहमदनगरची ही भावंडे जग जिंकत आहेत

घरी असताना ही भावंडे मुख्यतः एकामेकांसोबत किंवा ऑनलाइन आव्हाने सोडवित असतात. “आम्ही दररोज सुमारे आठ ते दहा तासांचा सराव करतो. घरी आम्ही एकतर एकमेकांविरुद्ध खेळत असतो किंवा ऑनलाइन स्पर्धा करत असतो. तथापि, हे नेहमीच असते की आम्ही एकमेकांना पूरक आहोत आणि ही चढाओढ आम्ही आमच्या डोक्यात जाऊ देत नाही. आम्ही एकमेकांना चांगलं बुद्धीबळ खेळण्यास मदत करतो,” असे दोघेही म्हणाले.

शार्दूल आणि शाल्मली दोघेही भाग्यवान आहेत की त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा या खेळासाठी संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांचे वडील, जे डॉक्टर आहेत आणि त्यांची आई देखील या खेळाला चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्यांच्या खेळाचे बारकाईने अनुसरण करताना त्यांना महत्त्वपूर्ण सूचना आणि अभिप्राय देतात.

Shardul gagare

शाल्मली एक डब्ल्यूआयएम होण्याव्यतिरिक्त आता एक दंतचिकित्सक (डेंटिस्ट) आहे आणि शार्दूल आपल्या बी.ए. कोर्सच्या अंतिम वर्षामध्ये शिकत आहे. “२०१२ मध्ये डब्ल्यूआयएम बनल्यानंतर माझ्या आईने मला करिअरचा दुसरा पर्याय निवडण्यास सांगितले आणि म्हणूनच मी दंतचिकित्सा निवडली. मी एमबीबीएस केले नाही, कारण माझ्या बुद्धीबळावरही लक्ष केंद्रित करण्यासाठी मला वेळेची गरज होती,” असे शाल्मली म्हणाली.

त्यांच्या पालकांच्या सहकार्यासह, शार्दुल आणि शाल्मली या दोघांनाही २०१४ पासून बुद्धिबळ प्रवास प्रायोजित करणारे आणि अहमदनगरमध्ये हा खेळ लोकप्रिय होत जाईल याची खात्री करुन घेणारे नरेंद्र फिरोदिया यांचे अमूल्य मदत मिळत गेली आहे.

Shalmali gagare

“२०१४ मध्ये, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटने अंतर्गत खेळत असताना, श्री नरेंद्र फिरोदिया यांचे माझ्या खेळावर लक्ष गेले आणि तेव्हापासून त्याने माझ्या कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यात मला मदत केली आहे. त्याने आम्हाला जगभरातील ग्रँडमास्टर्स कडून योग्य प्रशिक्षण घेण्यास मदत केली. अश्या मदतीशिवाय मला माहित नाही की मी किती दूर जाऊ शकलो असतो आणि मला ही मदत आधी मिळाली असती तर मी भारतातील सर्वात तरुण ग्रँडमास्टरपैकी एक होऊ शकलो असतो,” असे शार्दुलने सांगितले.

श्री. फिरोदिया तिचे आधारस्तंभ राहिले आहेत आणि ग्रँडमास्टर होण्याच्या टप्प्यावर पोहोचण्यास मदत केली आहे, असेच शाल्मलीचे देखील हेच विचार आहेत.

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टची क्रीडाक्षेत्रात प्रेरणादायी कामगिरी

श्री. नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर जिल्ह्यात सर्व बुद्धिबळ खेळाडूंसाठी अनेक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ लीग स्पर्धेतील टीम अहमदनगर चेकर्सच्या मालकांपैकी ते एक आहेत ज्यात भारतातील सर्व अव्वल ग्रँडमास्टर्सचा समावेश आहे.

Narendra firodia
श्री नरेंद्र फिरोदिया यांसोबत शार्दुल व शाल्मली गागरे.

श्री नरेंद्र फिरोदिया यांच्या सक्षम नेतृत्वात, अहमदनगरमध्ये मॅक्सिमस स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी स्थापली जी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टच्या अंतर्गत आहे. शहरातील आणि शहराबाहेरील असलेल्या खेळाडूंना उत्तम संसाधने उपलब्ध करुन देणे आणि त्यांना क्रीडा क्षेत्रातील यशाची शिडी चढण्यास मदत करणे हे या अकादमीचे लक्ष्य आहे. बॅडमिंटन ते बुद्धीबळापर्यंत, ही अकादमी राज्यात काही उत्कृष्ट प्रतिभावान खेळाडूंना मदत केली आहे.

श्री शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनची स्थापना एप्रिल २००७ मध्ये झाली. ट्रस्टचे प्रमुख लक्ष्य म्हणजे त्या वेळच्या उभारत्या खेळाडूंना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करणे आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे होते.

असाधारण कौशल्य आणि जिद्द बाळगणार्‍या मुलांसाठी अहमदनगरमध्ये जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी सुरु करण्याचे श्री. नरेंद्र फिरोदिया यांचे आता स्वप्न आहे.