शुक्रवार, मार्च 5, 2021
Home कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस : बाईचुंग भूटियाने लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना निवारा दिला

कोरोना व्हायरस : बाईचुंग भूटियाने लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना निवारा दिला

भूटिया सर्व प्रवासी कामगारांना निवारा आणि मूलभूत रेशन देऊ इच्छितात व त्यांना ही सेवा देण्यासाठी ते स्थानिक अधिकार्‍यांसह एकत्र काम करीत आहे.

भारतीय फुटबॉलची जगप्रसिद्ध व्यक्तिरेखा, बाईचुंग भूटिया यांनी ३० मार्च रोजी कोविड -१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर २१ दिवस चाललेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे उद्भवणार्‍या सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी सिक्किम मधील स्थलांतरित कामगारांना आश्रय देऊ केला आहे.

मागील मंगळवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित कामगार, घरी परतण्यासाठी हतबल झाले होते. “लॉकडाऊन दरम्यान ज्या लोकांना सर्वाधिक त्रास झाला ते स्थलांतरित कामगार आहेत. काल सिक्कीमच्या सीमेवर एक प्रचंड लांब रांग लागली होती. मला गंगटोकमध्ये (लुमसे, ताडोंग) एक नवीन अपूर्ण इमारत मिळाली आहे. यात जवळपास १०० लोक राहू शकतील एवढी जागा आहे,” असे भूटिया यांनी पीटीआयला सांगितले.

“मी अशा सर्व स्थलांतरित कामगारांना, ज्यांच्याकडे तेथे राहण्यासाठी घर नाही, त्यांना निवारा देऊ केला आहे. आम्ही त्यांना काही मूलभूत रेशन देखील पुरवू. ते कसे केले जाऊ शकते हे पाहण्यासाठी मी स्थानिक अधिकार्‍यांसह कार्य करीत आहे. आम्ही पाठिंबा देऊन एकत्र काम करु शकतो.” भुटिया पुढे म्हणाले की, वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यासाठी ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.

“आत्तापर्यंत कोरोनाचे एकही रुग्ण आढळला नाही. जेणेकरुन ते (प्रवासी कामगार) कोरोनापासून सुरक्षित असतील. डॉक्टर देखील तपासू शकतात. आम्ही सरकारला विनंती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कमीतकमी जेव्हा राज्याच्या सीमा बंद केल्या जातील तेव्हा किमान ते घरात असलेल्या कारणाने कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून सुरक्षित असतील. लॉकडाउनमुळे, त्यांना जाण्यासाठी कुठलेही ठिकाण नाही त्यांना सर्वात वाईट फटका बसला आहे.”

भूटियाने आपल्या क्लब युनाइटेड सिक्कीमचे वरिष्ठ व्यवस्थापक अर्जुन राय यांच्या फोन नंबरसह हे आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील पोस्ट केले. “समस्येसंदर्भात कोणत्याही मदतीसाठी यांच्याशी ९४३४११७४६५ वर संपर्क साधला जाऊ शकतो,” पोस्टमध्ये असे नमूद केले आहे.