गुरूवार, मार्च 4, 2021
Home कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस : मिताली राज आणि रोहित शर्मा यांनीही केली आर्थिक मदत..!

कोरोना व्हायरस : मिताली राज आणि रोहित शर्मा यांनीही केली आर्थिक मदत..!

भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी क्रिकेटर मिताली राज आणि पुरुष क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी क्रिकेटर मिताली राज आणि पुरुष क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

भारतीय महिलांची एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार व अनुभवी क्रिकेटर मिताली राज यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध लढा म्हणून मितालीने दहा लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. मिताली यांनी पंतप्रधानांच्या मदत निधीला ५ लाख आणि तेलंगाना सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीला ५ लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटच्या मदतीने मितालीने याची घोषणा केली.

मिताली राजने १० कसोटी सामने, २०९ एकदिवसीय सामने आणि ८९ टी-२० सामने खेळले आहेत ज्यात तिने सर्व स्वरूपात ९९१५ धावा जमविल्या आहेत.

दुसरीकडे, क्रिकेटर रोहित शर्माने कोरोना व्हायरस विरुद्धच्या भारताच्या लढाईत मदत म्हणून तब्बल ८० लाख रुपये देऊ केले आहे. रोहित शर्मा, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आहे. त्याने ४५ लाख रुपये पंतप्रधान मदत निधीत आणि २५ लाख रुपये महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री मदत निधीत दान केले आहेत.

याशिवाय, त्याने ‘झोमॅटो फीडिंग इंडिया’ ला, जे लॉकडाउन मुळे संकटात आले आहे त्यांना रोजचे जेवला घालत आहे, त्यांना ५ लाख रुपये दान केले आहे. रस्त्यावरील कुत्र्यांच्या हितासाठी, त्यांना खायला मिळावे यासाठी रोहितने ५ लाख रुपयांची मदत केली आहे.

यापूर्वी सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली यासारख्या खेळाडूंनी गरजूंना मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या रिलीफ केअर फंडात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत २२५ लोकं कोरोना व्हायरसने संक्रमित निघाले होते, सध्या या साथीच्या आजाराने महाराष्ट्र सर्वांत जास्त पीडित राज्यांपैकी एक आहे.