रविवारी, १५ वर्षीय नेमबाज एशा सिंगने कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यात पंतप्रधानांच्या मदत निधीला ३०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी आर्थिक योगदान देणारी ती देशातील सर्वात लहान क्रीडापटू ठरली आहे.
एशाने तिच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “कोविड -१९शी लढण्यासाठी पी. एम. केअर फंडला मी माझ्या बचतीतून ३० हजार रुपयांचे योगदान देण्याचे वचन देते. देश है तो हम है.” कोविड -१९ ने जगभरात कहर केला आहे आणि यामुळे आतापर्यंत लोकं संक्रमित झाले असून लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.
I pledge to contribute 30 thousand Rupees from my savings to P.M CARE FUND to Fight Covid 19 Desh hai to hum hai @narendramodi @KirenRijiju @Media_SAI @kheloindia @Gun_for_Glory @TelanganaCMO @KTRTRS @VSrinivasGoud @jayesh_ranjan @RaninderSingh @gaGunNarang pic.twitter.com/eK5MY5goSh
— Esha Singh (@singhesha10) March 29, 2020
गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये तिने १० मीटर एअर पिस्तूल गटात भाग घेऊन आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. अलिकडच्या काळात दाखवलेल्या अनेक तरुण भारतीय नेमबाजांपैकी एक, एशाने २०१८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत एक जबरदस्त कामगिरी केली होती – ज्येष्ठ, कनिष्ठ आणि युवा अशा तिन्ही गटात सुवर्ण पदक जिंकले होते!
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आता पर्यंत ७.८लाख लोकं संक्रमित झाले असून ३७हजारच्या वर लोकं यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्याने राजधानी दिल्लीत हजारो स्थलांतरित कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. बुधवार पासून सुरु झालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काहीही वाहतुकीचे पर्याय उपलब्ध नसल्याने हजारो लोकांनी, बहुतेक तरुण पुरुष-मजूरच, परंतु कुटुंबेही पायी प्रवास करुन आपआपल्या गावी जायला निघाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कामगारांनी नवी दिल्ली येथून पळ काढण्यास सुरवात केली. यामुळे लाखो भारतीयांना रोज मिळणार्या रोजगारावर वाईट परिणाम झाला. बांधकाम प्रकल्प, टॅक्सी सेवा, घरकाम आणि इतर अनौपचारिक क्षेत्रातील रोजगार अचानक ठप्प झाला आहे.