जगातील ७.८ लाख लोकांना संक्रमित करीत आजारात साथीच्या रोगाने जगभरात सुमारे ३८,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात, १,४०० हून अधिक जणांना या प्राणघातक विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर आतापर्यंत ४० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. अश्या संकटकाळी, देशातील अनेक क्रीडा संघटना गरजूंच्या मदतीस धावून आले आहेत.
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली सरकारला क्वारंटाईन सुविधा तयार करण्यास सोपविले आहे. जिल्हा दंडाधिकार्यांनी क्वारंटाईन करण्याच्या उद्देशाने वापरता येईल का, असे विचारल्यानंतर एसएआयने लगेच स्टेडियम दिल्ली सरकारच्या ताब्यात दिले. क्रीडा मंत्रालयाने २२ मार्च रोजी जाहीर केले होते की देशभरात एसएआय अंतर्गत सर्व स्टेडियम क्वारंटाईन सुविधा देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. याशिवाय, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) कर्मचार्यांनीही तीन दिवसांचा पगार मिळून तब्बल ७६ लाख रुपये पीएम कॅरस फंडाला दिले आहेत.
कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान केअर फंडला ११ लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे. या बरोबरच, उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेच्या वतीने बृजभूषण यांनी जाहीर केले आहे की ते मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी ५ लाख रुपयांचे योगदान देतील. बृजभूषण यांनी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले असून या वेळी सर्वांनी पुढे येऊन दान देण्याचे आवाहन केले आहे. वाराणसीतील कुस्ती मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार यांनी सुद्धा राज्य मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ड्रीम-११ ने परोपकारी संघटना ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशन (डीएसएफ) च्या माध्यमातून झोमॅटो बरोबर भागीदारी करुन “रोजच्या मजुरीवर जगणार्य कामगारांना अन्न पुरवठा” करण्यास पाठिंबा दर्शविला आहे, असे ड्रीम-११ने सोमवारी जाहीर केले होते. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या समुदायांना खाद्यान्न आधार प्रदान करण्याचा झोमॅटोने प्रण केला आहे. शनिवारी, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपिंदर गोयल यांनी सांगितले की त्यांनी या मोहिमेचा एक भाग म्हणून आधीच १२ कोटी रुपये जमा केले आहेत.
या शिवाय, भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने १.२५ करोड रुपये जमा केले आहेत ज्यामुळे देशातील १ लाख गरजूंना त्याचा फाडा होईल. तिने काही लोकांच्या मदतीने हजारो गरजू कुटुंबांना अन्न दिले आहेत.