शुक्रवार, मार्च 5, 2021
Home कोरोना व्हायरस २०२१च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत

२०२१च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली २०२०ची टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत.

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली २०२०ची टोकियोतील ऑलिंपिक्सच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. पुढच्या वर्षीच्या २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि टोकियो २०२०चे प्रमुख योशिरो मोरी यांच्यात झालेल्या दूरध्वनीद्वारे झालेल्या बैठकीत सोमवारी तारखा ठरविण्यात आल्या होत्या.

कोविड -१९ च्या जागतिक स्तरावरील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आयओसीने अ‍ॅथ्लिट्स, क्रीडा महासंघ, सरकारी अधिकारी आणि समीक्षक यांच्याकडून आलेल्या दबावाखाली येऊन शेवटी यावर्षी होण्यार्‍या स्पर्धेला पुढच्या वरशीपर्यंत ढकलले आहे.

जापानमध्ये होणारी दुसरी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर टोकियो २०२० च्या आयोजक समितीचे अध्यक्ष मोरी यांनी तीन आठवड्यांच्या कालावधीत नवीन तारखा ठरविण्याची सूचना केली होती पण जापानच्या माजी पंतप्रधानांनीही यावर निर्णय घेण्यावर भर दिला होता की खेळ “शक्य तितक्या लवकर” आयोजित होतील.

ऑलिम्पिकच्या १२४ वर्षांच्या इतिहासातील मागील आठवड्यातील जाहीर झालेला विलंब हा जापानसाठी मोठा धक्का आहे. हे निश्चित आहे की आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विचलन होऊन खूप मोठा प्रभाव होणार आहे, ज्याने स्पर्धा आयोजित करण्यासाठी १३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आणि जापानी प्रायोजकांकडून ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

आता पर्यंत जगभरातील ७.८ लाख लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे आणि तब्बल ३७,०००च्या वर लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.